He aaplyala kalayla hawa

On September 09

He aaplyala kalayla hawaस्वत:च स्वत:वर प्रेम असाव.....

आरशात पाहताच स्वत:च्या रुपावर भाळुन जाव 'छान दिसतेस'!

अस कुणी कश्याला म्हणायला हव?

आपण आहोतच छान हे आपल आपल्याला कळायला हव असेल नाक अपरं रंगही नाहीच

केतकी कोणाला वाटते उंच कोणाला ठेंगणी ठुसकी पण दुसर्याच्या मोजमापात स्वत:ला कश्याला बसवायला हव

स्वत:ला पाहून एक गिरकी घे ऊन स्वत:च आनंदून जायला हव

आपण आहोतच छान हे आपल आपल्याला कळायला हव

सदाच कशाला स्नो पावडर कोरीव भुवया मेक अपचा थर

निसर्गान दिलेल शरीर सुंदर निरोगी मात्र असायला हव

आपण आहोतच छान हे आपल आपल्याला कळायला हव

नसो नसेल तर रेशमी साडीचा पदर साधाच असेल सलवार कमीज दुपट्टा त्यावर

असल्या गोष्टी असतात वरवर त्यान कशाला दु:खी व्हायला हव आतल मन मात्र आकाशा सारख निरभ्र असायला हव

आपण आहोतच छान हे आपल आपल्याला कळायला हव

विश्वास असेल आपल्याला आपल्या वर

विरोधाचा सुर सुद्धा होईल सुस्वर

कर्तुत्वाच एक फुल उमलेल तुज्या वेलीवर

प्रसन्न टवटवीत गुलाबासारखे तेव्हा मात्र हसायला हव

आपण आहोतच छान हे आपल आपल्याला कळायला हव........Responses

Nice

Yes, really goodone.

Could have been better.

Cool.

?

Leave your comment