- काही भाव बोलून जातात, तो अर्थ प्रत्येक शब्दात नसतो. ओली हवा धूंद करते, ती साद नुसत्या हवेत नसते...!!!
- दिवस परत येत नाहीत म्हणून आठवणी असतात आणि मनाच्या पिंज-यात अगदी हळुवारपणे भेटतात...!!!
- पहाटेचा गार वारा तुझा स्पर्श भासतो, शहारून वेडा तेव्हा स्वत:शीच हासतो, अवखळ झ-यागत नादातच वाहतो, कुणालाही उमजेना तो असा का वागतो…!!!
- तिचा स्पर्श जेव्हा फुलपाखराला होतो, रंग फुलपाखराचा अजूनच नव्याने फुलतो, ती हसते फुलपाखरासारखी, ती रुसते फुलपाखरासारखी, ती अन फुलपाखरू एकसारखेच दिसते, तिने फुलपाखराला पाहिल्यावर तेही जरासे लाजते...!!!
- मौनाचे ही तुझे इशारे आता कळु लागले का मनातले अर्थ सारे मला छळु लागले…!!!
----------------------------------------------------------------------------------------------------------
जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी..
माझे जगणे होते गाणे..
कधी मनाचे कधी जनाचे
कधी धनास्तव कधी बनाचे
कधी घनाशय कधी निराशय केवळ नादतराणे..
आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली केव्हा फक्त बहाणे..
राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रंदन
अजाणतेचे अरण्य केव्हा केव्हा शब्द शहाणे..
जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदृष्यातिल आदेशांचे
ओझे फक्त वहाणे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
- जे सगळ्याना माहीत आहे ते तुला नाही ठाऊक तुझ्या दिशेने येणारी झुळूक सुद्धा माझ्यापाशी होते भावूक...!!!
- कुणीतरी मला विचारले कि.... तू तिला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादेपर्यंत जावू शकतोस???
- मी हसत उत्तर दिले....'जर मर्यादाच ओलांडायच्या असत्या तर तिला कधीच मिळवले असते…!!!