पुर्णविराम म्हणजे शेवट नाही,
कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो,
त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो
तर ती नव्या यशाची सुरूवात असते.
आनंदाने जीवनाची मजा लुटा, दुःखाला दुर सारून प्रयत्न करा.
हेच खरे जीवन होय.
॥ॐ साई राम॥
मावळ्यांनो, कसा येऊ मी परत!
कुणी मला म्हणतो शिवराय
तर कुणी म्हणतो शिवबा,
कुणी मला म्हणतो छत्रपति
तर कुणी म्हणतो मराठा,
पण सर्वांची एकच हाक असते....
राजे........परत या,
राजे........परत या.
***************
कुणी म्हणतो मी शिवबाचा मावळा
तर कुणी म्हणतो, कट्टर शिवभक्त,
पण सर्वांची एकच हाक असते.....
राजे........परत या,
राजे........परत या.
***************
कुणी म्हणतो,
जय भवानी, जय शिवाजी
तर कुणी म्हणतो,
जय जिजाऊ, जय शिवराय.
पण सर्वांची एकच हाक असते.....
राजे.......परत या,
राजे.......परत या.
******************
कुणी म्हणतो, हिन्दवी स्वराज्य रक्षक,
तर कुणी म्हणतो स्त्री सम्मान रक्षक.
पण सर्वांची एकच हाक असते.....
राजे.......परत या,
राजे.......परत या.
********************
अरे, कशाला येऊ मी???
तुमचा नामर्दपणा पहायला???
*********************
माझ्या राज्यात
स्त्री जातीचा सम्मान राखला जात होता.....
येथे तर रोजच "खैरलांजी" घडतात.......
माझ्या राज्यात
पराक्रमाला बक्षिसे मिळायची....
येथे तर रोजच "दाभोळकर" अन्
"पानसरेंच्या" मर्डरी होतात....
**************************
चालविण्याशी राज्य कारभार
सुरतेवर मारीले छापे अनेक.....
निर्माण करण्या शत्रूवर वचक
जिंकिले गड-किल्ले अनेक.....
************************
रक्षण करण्या स्वराज्याचे
उभारले आरमार सागरी.....
कसे नाही कळले तुम्हासी,
कसाब बसला ना उरावरी.....
************************
अरे, परत नका म्हणू तुम्ही मला....
राजे......परत या,
राजे......परत या......
अरे, कशाला येऊ मी परत???
तुमचा नामर्दपणा पहायला???
************************
जर खरंच तुम्ही असाल माझे खरे मावळे....
जर खरंच तुम्ही असाल खरे शिवभक्त....
तर......
आदर्श, सिंचन, कॅम्पा-कोला सारखे
"महाघोटाळे" होत असताना षंढासारखे
स्वस्थ बसू नका,,,,
स्वत:ला माझे मावळे म्हणविता ना?????
मग तानाजी मालुसरे, संताजी घोरपडे,
धनाजी जाधव, जीवा महालांसारखे व्हा.
माझी मराठी भूमी संकटात आहे,
माझं स्वराज्य संकटात आहे,
आया-बहिणींची अब्रू वाचवा.......अन्
महाराष्ट्राचे नाव सातासमुद्रपार दूमदूमु द्या...
*********************************
अरे, पावणे चारशे वर्षे झाली जाउनी मज,,,
आता तरी स्वराज्याची जवाबदारी घ्या,,,,
अन् माझा स्वाभिमानी मावळा व्हा!
पुन्हा नका म्हणू, राजे....परत या.
अरे, मी तर आहे ना तुमच्याच...नसानसांत,,,,
विश्वास नाही का!!!!
मग बोला कि,,,,,,,
हर हर महादेव.......
लेखक :एक शिव भक्त
तुमचे आमचे नाते काय
जय जीजाऊ जय शिवराय
.....