Heroji Indulkar and Shivaji Maharaj


On September 09

Heroji Indulkar and Shivaji Maharaj


Shivaji Maharaj and Heroji Indulkar

असाही एक हीरोजी इंदलकर....॥

शिवछत्रपती महाराजानी जीवन भर एकच वसा पेलला तो म्हणजे माणूस जोड्न्याचा ..

मराठयानी इतिहास घडविला परन्तु मराठयानी इतिहास लिहला नाही . शिवाजी राजांनी स्वराज्य उभे केले ते नेमके याच्याच बलावर …

"निष्ठा" माणसं कशाच्या मोहने शिवाजीराजां कडे आली….

विश्वास दिला राज्यानी”आपल राज्य उभा करायचा”मला छत्रपती व्हायच म्हणून नाही ….

तमाम मराठयांच राज्य निर्माण करायच, रयतेच राज्य गरीबांच राज्य तयार करायच आहे.. ही काळजी इथल्या माणसा -माणसा मध्ये होती ….

हिरोजी इंदलकर नावाचा बांधकाम प्रमुख शिवाजी महाराज्यान कडे होता. रायगड किल्ला बांधायची जबाबदारी राज्यानी त्याच्यावर सोपावली …

शिवाजी महाराज स्वारी वर गेले… हिरोजीने किल्ला निम्यावर बांधत आणला .. आणि पैसा संपला हिरोजिला समजेणा काय करावे .. महाराजांनी तर जबाबदारी टाकली आहे . किल्ला तर पूर्ण केला पाहिजे.. तर पैसा शिल्लक नाही त्या हिरोजिने अपूर्ण काम केले. आपला राहता वाडा , आपली जमिन विकली. बायकोसह रायगडावर आला.. पैशासह जोपड़ी घेऊन राहू लागला आणि मराठयांची राजधानी बांधून काढली शिवाजीना आल्यावर कळल हिरोजिने काय केले . राज्याभिषेकाच्या वेळी त्या राजेंना वाटल या हिरोजिंचा सत्कार करावा ..

राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी म्हणाले,”हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधला , बोला तुम्हाला काय हवय.” त्यावेळी हिरोजी नम्रपणे मान जुकवून म्हणाला ,”महाराज , उभ स्वराज्य तुम्ही पदरात टाकल .. आम्हाला आणखी काय हवय….” महाराज म्हणाले नाही काही तरी मागितलेच पाहिजे ,त्यावेळी हिरोजी म्हणाला महाराज एक विनंती आहे .. रायगडावर आम्ही जगदिशवराचे मंदिर उभारल आहे .त्या जगदिशवराच् या एका पायरीवर आमच नाव कोरायची अनुमति आम्हाला दया . महाराजाना कलेणा हे कसल मागण..पगार वाढ नाही मागितली, देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली , वतन नाही मागितल …मागुन मागितले तर काय दगडावर नाव कोरयची परवानगी महाराजानी विचारल हिरोंजी अस का …???? आणि हिरोंजी उत्तर देतात,”राजे..! ज्या- ज्या वेळी रायगडावर असाल,त्या- त्या वेळी जगदिशवराच्या दर्शनाला तुम्ही याल… ज्या-ज्या वेळी दर्शनाला जाल ..त्या- त्या वेळी तुमची पाऊल त्या पायारीवर पडत जातील …आणि महाराज त्यातल्याच जर एका पायरी वर माजे नाव कोरले असेल ..तर त्या- त्या वेळी तुमच्या पाऊलाची पायधूळ म्हणजे माज्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहिल..”

अश्याही शिवरायी मावळ्यास मानाचा मुजरा

!! जय भवानी ।| जय शिवाजी राजे।| जय शंभूराजे ।| |मराठशाहिची उमेद पुन्हा जगु दे|⛳ शुभ प्रभात!!

You may also like :





Responses