Save Water - Pani Wachwa


On September 09

Save Water - Pani Wachwa


 

Save Water Marathi

 

नमस्कार! या वर्षी पाऊस कमी पडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे म्हणूनच -

पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा. आता सप्टेंबर महिना सुरू आहे. पुढच्या वर्षी जूनमध्ये पाऊस पडला तरी अजून आपल्याला 7 महिने धरणात शिल्लक असलेल्या पाणीसाठ्याचा जपून वापर करावा लागणार आहे. तेव्हा आता प्रत्येकाने दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाला येणार असलेल्या जलसंकटाला सामोरे जाण्यासाठी जाणीवपूर्वक काळजी घ्यावी लागणार आहे . आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या घरी अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून पाणी वाचवू शकतो. बघा, जसे की -

1) अंघोळीला shower ऐवजी bucket वापरा.

2) सकाळी लहान पातेल्यात पाणी घेऊन त्यात भाज्या धुवा. ते पाणी कुंडीतल्या झाडांना घाला.

3) सकाळी लहान पातेल्यात पाणी घेऊन त्यात स्वयंपाक करताना खराब होणारे हात धुवा.

4)खरकटी भांडी टबात किंवा बेसिन मध्ये टाकण्यापूर्वी tissue किंवा जुन्या News Paper च्या तुकड्याने पुसून टाका.

5) दात घासताना, दाढी करताना बेसिनचा नळ अनावश्यक चालू ठेवू नका.

6) भांडी, कपडे धुताना कमी फेस येणारे detergent वापरा.

7) washing machine एक दिवसाआड वापरा.

8) पाणी शिळे होत नाही, तेव्हा साचवलेले पाणी शिळे आहे म्हणून फेकून न देता लादी, कपडे, भांड्यांना वापरा.

9) नळ काळजीपूर्वक बंद करा. अावश्यक तेवढाच पाणीसाठा करुन ठेवावा.

10)थोड़े खराब असलेले पाणी ओतून न देता झाडांना घालावे.

11) रस्ते, गाड्या, पार्कींग धुण्यासाठी पाणी वाया घालवू नका.

12) टाॅयलेट मध्ये फ्लशचा वापर टाळा.

13) स्वतःच्या हौसेमौजेला जरा कमी करुन दुष्काळग्रस्त बांधवांसाठी सढळ हाताने मदत करावी.

 

लक्षात असू द्या धरणाची जलसंपन्नता आपल्याकडे असली तरी पावसाची स्थिती अशीच राहिली तर येणारा काळ आपल्या कसोटीचा आहे. त्यामुळे आपण पाणी बचतीबाबत व्यापक जनजागृती करून या कठीण प्रसंगाला एकजुटीने सामोरे जाऊया. आपण स्वतः पाणीबचत करूयाच शिवाय आपले कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्यापर्यंतही हा 'पाणी वाचवा' संदेश पोहचवून माणुसकीचे आणि बौद्धिकतेचे दर्शन जगाला दाखवून देऊया. (कृपया हा जलबचतीचा संदेश सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत प्रसारीत करण्यासाठी सहकार्य करावे, ही विनंती.)

You may also like :





Responses