जमिनीवर बसून का जेवण जेवावे
जमिनीवर बसून का जेवण जेवावे...?
●जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे
१- पचन सुधारते
जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची
स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने
जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत
होणार्या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील
स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.
२-वजन घटवण्यास मदत होते
जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते.
वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक
खाणे. जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून
मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे
राखू शकते. टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा
वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते.
परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व
वजनही काबूत राहते.
३-लवचिकता वाढवते
पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील
स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा
स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण
पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी
पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व
आरोग्यदायी बनण्यास मदत होते.
४-मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते
जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष
जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने,
जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे
ग्रहण करण्यास समर्थ होते.
५-कुटुंबातील सदस्यांशी जवळीक वाढते
दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत
जरूर आनंद घ्यावा.दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका
होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग
शोधण्यास मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी
जवळीक वाढते.
६-शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते
शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक
आहे.शरीरातील काही स्नायू व सांध्यांवरील अतिरिक्त
ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते.
जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व
पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात
हालचाल होते.
७-दीर्घायुषी बनवते
ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य
वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या
अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर
मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता
उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे. कारण
अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक
असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा
मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने
अधिक असते.
८-गुडघे व कमरेतील सांधे मजबूत होतात
Yoga for Healing या पुस्तकाचे लेखक पी.एस. वेंकटेशवरा
यांच्यामते, पद्मासनामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत
होते. पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही.
गुडघा, घोटा व कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक
विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने
स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.
९-चंचलता कमी होते
मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील
थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी
घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व
परिणामी शरीरातील त्रास कमी होतात.
१०-हृदयाला होणारा रक्तपुरवठा सुधारतो
काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम
आल्याचे आठवते का ? हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन
होण्यासाठी शरीराला उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर
बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील
रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.
You may also like :